Monday, May 9, 2016

तो आणि तो भाग ५

           ती ऑफिस मध्ये विकली  बोरिंग मीटिंग मध्ये बसली होती. पन्नास टक्के लक्ष तिचं सतत वाजणाऱ्या फोन कडे होतं, तिने फोन टेबल खाली लपवून हळूच चेक केला, त्याचे ५ फोने येउन गेले होते आणि एक मेसेज आला होता इमर्जन्सी .. फोन कर. . ती मीटिंग रूम मधून बाहेर  टेरेस  गार्डन  मध्ये आली आणि तिने त्याला फोने लावला.

" काय अरे काय झालं, पटकन सांग खूप टेन्शन आलय मला."
" तू कुठे आहे अत्ता? ऑफिसच्या आत आहेस का बाहेर"
" अरे ... कुठे असणार ऑफिस मधेच अर्थातच ... आणि तू हे काय  सीआइडिगिरी चालवलीस इमेर्जेन्सी काय ते सांग आधी."
" ओके , मला सांग तू खिडकीत येतेस का जरा"
" तुला वेड लागलय  का रे .... काहीही वागतोस का आजकाल , इमेर्जेन्सी सांगतोस आणि टाईमपास प्रश्न विचारतोस , टेरस वर उभी आहे बोल.. आता कुठे बघू .? ... खूप चीडचीड होतीये माझी तुझ्यावर त्यामुळे तू आता कृपया करून कशासाठी फोने केलायस ते सांग"
" वर बघ ना आकाशात इंद्रधनुष दिसतोय का? वातावरण पण किती छान झालाय आणि मंद भिजलेल्या  मातीचा सुगंध... ऐक ना .. चल ना जाऊयात बईक वर मस्त लांब चक्कर मारून येऊ शहरापासून लांब जाऊ. अगं तुला आठवतं का तुझ एक स्वप्न होतं त्या टेकडवरच्या पंचतारांकित रेस्टो मध्ये तुला लेक चा विव्ह  दिसणाऱ्या जागेवर बसून मस्त कॅण्डल लाईट डिनर करायचा होता , सांग ना जाऊयात का तिकडे अत्ता? मी येतो लगेच तुझ्या ऑफिस खाली तू ये खाली आपण लगेच निघू अत्ता ३ वाजलेत तर २ ते २.३० तासात पोचू मस्त जेवण करू, इंद्रधनुष तोपर्यंत असेल तर मग काय एकदम सरस आणि नसेलच तरीही मस्त चंद्र असेल आपल्या सोबतीला .... "
ती त्याची कल्पना आणि त्याने रंगवलेल्या चित्राच्या मोहात पडली आणि तिला असा वाटला बस अत्ता लगेच इथून निघावा पण मग एकदम तिला लक्षात आला आपण ऑफिस मध्ये आहोत आणि आज घरी लवकर जायचं कारण आईंनी सकाळीच सांगितला होता आज न्यवध्य साठी मोदक करायचे होते.
"अरे नाही रे जमणार एकतर मी अत्ता ऑफिसे मधून नाही निघू शकणार आणि जरी काहीतरी कारण काढून निघाले तरी आज घरी लौकर जायचं आईंना मोदक करू लागायचं त्यांना आज न्यवध्य लावायचं कसला तरी . नाही रे नाही जमणार ते पण असा वेळेवर, ऑफिस मध्ये काम पण खूप आहे आणि नो एकंदरीत सगळा विचार करता नाही जमणार."

" ठीक आहे नको येउस जातो मी एखाद्या मित्राला घेऊन मग नको म्हणूस कि मी एकटाच मज्जा करतो तुला कुठे नेत नाही वगेरे .... आणि हो...  कर काम,  कंपनी जसा काय फक्त तुझ्या एकटीच्याच कामावर चालतीये ना ..  अजून २ तासाने जेव्हा मी तिकडे पोचल्यावर तुला फोन करून सांगेल ना कसा भार्री वाटतंय ते , तेव्हा मनात म्हणशील .. आय विष मी आता तिकडे असते तर ...लक्षात ठेव मौका एक हि बार मिलता है.. और मुके पे चौका मारणं सिर्फ अर्ची जैसी लडकीयौ को आता है .. तू बस ऑफिसात स्क्रीन बघत .. आणि हो मोदकाचं टेन्शन घेण्याचा प्रश्नच न्हवता मी सांगितला असत आईला नको तो घाट घालूस आम्ही बाहेर जातोय  आणि तसही मी तिला  आधीच समजून सांगितल आहे कि आहे ते आयुष्य एकदम मजेत घालव उगाच नको ते उपासं न्यवध्य  वगेरे करत जाऊस त्यामुळे ती काही बोलली नसती.  त्याने असा तिला पटवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून होकार नाही आला आणि त्याने रागात फोने ठेवला.

ती पण विचारात जबरदस्ती स्क्रीन वर बघून काम करायचा प्रयत्न करत होती आणि विचार करत होती जायला होता राव मी , २ तास काम कमी केल्याने काय कंपनी बुडणार न्हवती आणि कंपनी तरी कुठे माझ्या वयक्तिक आयुष्याचा विचार करते.. त्यांचा  फायदा तेवढा बघतात आणि १०० काम चांगली करा आणि एक चूक करा लगेच सगळे चांगले काम विसरतात मग मी तरी का एवढा त्याग करतीये.. त्यांना तरी कुठे एवढ सोपा आहे मला कामावरून काढणा नुसता घाबरवतात मुळात त्यांनाच आम्ही सोडून जाऊ ह्याची भीती म्हणून आम्हाला घाबरवतात मार्केट मध्ये जॉब्स नाहीत ... ह्म्म्ह  नुसता डोक्यात विचारांचा गोंधळ. तिने स्वतःला कामात गुंतवायचा प्रयत्न केला आणि नकळत हात फोने कडे गेला आणि त्याला फोन  लावला आणि खिडकी जवळ गेली बोलण्यासाठी ..
" हेल्लो , कुठे आहेस रे ? चिड्लाय का रे खूप ? अरे खर तर ना .." तिचा बोलन मध्ये थांबवत ," खिडकीत ये आणि खाली बघ " तिने खाली डोकावला तो बाईक वर बसून तिच्याशी बोलत वर बघत होता , तिने पटकन सगळा बंद केलं तिचा चामडी झोर्या खांद्य्वर टाकून त्याच्या जवळ पोहचेपर्यंत श्वास नाही घेतला.
" अरे तू कसला आहेस रे , मला वाटला जाशील तू खरच कोणाला तरी घेऊन "
" चल बस पटकन पुढे थांबलाय मित्र , त्याला म्हणालो गयबानसिंग घेऊन येतो आमचा रस्त्याने चीक्खल झालाय गाडी फसली कुठे तर चीक्खल काढायला कोणीतरी लागेल ना "
" शायनिंग नको मरूस लैइ , चल गप्प अडाणी बबुच्क्या  ... मीच शिकवलंय तुला एन्जोय करायला , आणि ते जे कोणी चिरकुट मागे आणलय  त्याला आत्ताच कल्टी दे "
" सांबा नाही आया रे ,  गम्मत केली मी "
तिने मस्त इन केलेला शार्ट बाहेर काढला केस मोकळे सोडले Jacket कमरेला बांधला आणि भुर्रर 

Friday, April 29, 2016

तो आणि ती भाग ४


          त्याने तिला ऑफिस मधून निघाल्यावर फोने केला आणि सांगितल मला भूक लागलीये खूप ,जेवण तयार नसेल तर काहीतरी खायला करून ठेव.... तो असा आठवड्यातून दोन वेळा तरी फोने करून सांगायचा ... तिला खूप आवडायच जेव्हा तो असा फोन करून सांगायचा कारण तो असा म्हणाला कि तिला एक वेगळाच अभिमान जाणवायचा आणि विचार करायची .. त्याला माझ्या हातचा जेवण खूप आवडता .... आता बाहेर कित्ती चमचमीत पदार्थ भेटतात पण हा कुठे हि असला तरी मला फोने करून सांगतो, आणि विशेष म्हणजे ह्याला नाव नसलेला पदार्थ जरी बनवून दिला तरी चाटून पुसून खातो ... आहाहा काय समाधान मिळतं ते बघून काय सांगू. ती  पण कधीकधी पाककलेचा अतिरॆक करायची.

             ती स्वयपाक खोलीत काम करत होती आणि तिने त्याला आत बोलावला आणि जेवणाच्या  टेबल वर वाफाळलेल्या पदार्थाची दिश ठेवली. त्याने पहिले  दोन घास खालले आणि म्हणाला काहीही बनवतेस का ग तू ? काय आहे हे. ती जोरात हसून म्हणाली, " मोतीमहाल हाहाहाहा अरे सकाळचा थोडा भिजवलेला साबुदाणा म्हणजे मोती शिल्लक होते  सो त्यात पोहे म्हणजे महाल टाकून फोडणी देऊन बन गया मोतीमहाल." तो काही न बोलता लपटोप मध्ये डोकं घालणार तेवढ्यात तिने आठवण करून दिली, " आपले काही नियम ठरलेत ते तुम्ही विसरला नसाल तर तोंडासमोर पडलेला यंत्र बंद करून आत ठेऊन या." त्याने एक भुवई ताचवून "look" दिला तिला आणि मोतीमहाल चा आस्वाद घेऊ लागला.

             तिला नेहेमीप्रमाणे बडबड करायचीच असते आणि आता विषय हि सापडला होता त्यामुळे एकदम जोश  मध्ये चालू होता तिचा , " का रे आपला ठरला होता ना , facebook दिवसातून एकदाच बघायचा आणि व्हट्सप्प बघायची गरज आहे असा मला वाटत नाही कारण तझा पूर्ण कुटुंब इकडे आहे समोर त्यामुळे जे काही जोक "वाटायचे "  असतील ते तोंडाने संग आम्हाला जिवंत देखावे   पाहायला खूप आवडेल .. समजला ना आणि बाकी काहीही तत्काळ अप्ताकाळ परिस्तिथी आलीच  असेल कोणाची तर फोन करतील तुला , घरी ऑफिस ची कामं अज्जिबात करायची नाही तिकडे कम्पनी ला आग लागली तरी चालेल , आणि रोज संध्याकाळी घरी आल्यावर आपण ठरला होता ना  एकमेकांना विचारायचा  दिवस कसा होता वगेरे.... मी विचारला तर तुझं सगळा लक्ष भांडी उलथा पालथ करण्यात आणि चिकित्सा करण्यात .. गप्पं खावं ना ... ओये तू काय  ती कढई खरडत बसलास थोडंच केलं होतं पोटाला आधार म्हणून .. स्वयपाक झाला आहे , जा  पहिले बाहेर आई बाबांशी गाप्पा मार थोडा वेळ त्यांना विचार कसा होतं दिवस आज काय केलं वगेरे ......मी तोपर्यंत ताट वाढते.

           रात्री झोपायला गेला  तेव्हा त्याला एकदम आठवला कि तिच्या बड्बडॆच्या नादात सांगायचा राहून गेला.. ," ऐक .... तू आज जे काही मोतीमहाल वगेरे बनवला होतास ना ...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती म्हणाली , " भारी लागत होतं ना .... my creative recipe ." त्याने ऐकला पण नाही आणि म्हणाला, " ठीक होतं .... पण त्यात काहीतरी कमी होतं ..., तू काय त्यात मसाला टाकला होतास का? " हो थोडासा मान हलवून म्हणाली ती त्यावर तो म्हणाला ," ओके .. नाश्त्याच्या पदार्थात  कोणी मसाला नाही टाकत, हळद मिरची कांदा कोथिम्बिर बास झालं, अजून कसलीतरी वेगळी चव लागत होती मला त्यात ." ती जाम चिडली होती आता त्याच्यावर , " नाकातला मेकुड टाकला होता त्यात चमचाभर .... थोडासा पोटाला आधार म्हणून घाईघाईत ह्याला बनवून द्या त्यात ह्याची चिकित्सा सुरु. "  तो आता एकदम गंभीर चेहरा करून म्हणाला , " ह्म्म्म तरी मी विचार करतोय मी आत्ता पाद्लो त्याचा आणि तुझ्या नाकाचा वास सारखाच का येतोय."

Thursday, April 28, 2016

तो आणि ती भाग ३

      आज शनिवार उशिरा उठायचा दिवस, पण रोज सकाळी लौकर उठायची सवय असल्यामुळे झोप काही लागत नव्हती, तरी कसा तरी ताणून ती ८.३० ला शेवटी बेड मधून बाहेर पडली इकडे तिकडे नझर टाकली तो  काही दिसत नव्हता पण एकंदरीत खोलीतला अस्ताव्यस्त   पसारा पाहून ती समजून गेली ह्याला अचानक पोटावरच्या थराचा साक्षात्कार झालाय आणि जोश मध्ये येउन प्रभात फेरी मारायला गेलाय. पसारा म्हणजे वर्षभर कुजत पडलेले स्पोर्ट शुझ बाहेर काढायला आजूबाजूचे बाकीचे बुटाचे खोके कपाटाबाहेर अस्ताव्यस्त  पडले होते. ती फ्रेश होऊन चहा बनवायला स्वयपाक खोलीत जायला निघाली समोरून तो हातात ट्रे मध्ये चहा आणि काहीतरी खायला  घेऊन येतांना दिसला, तिला वाटला ती अजून झोपेतच आहे ती परत आत जाऊन तोंड धुण आली.

     ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत बसली होती आणि काहीतरी बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात तो म्हणाला , " गरम गरम चहा आणि बटाटा वडा ... इंजोय्य्य बेबी ..." त्यावर ती चेहऱ्यावर नेहेमीचा टोमणा भाव आणून म्हणाली  , " चक्क तू माझ्यासाठी आयता चहा बनवून खोलीत घेऊन आलास आईने काहीच टोमणा नाही मारला." तो आधी हसला तिचा ऐकून मग प्रेमाने तिच्या जवळ जाऊन अगदी रोमांटीक झाल्यासारखा दाखवून म्हणाला, " आई मध्ये आलीच पाहिजे का ? तुझी नेहेमी  इच्छा असते कि मी एकदातरी  सकाळी उठल्यावर  तुझ्या हातात असा चहा नष्ट द्यावा आज पूर्ण झालीये  तर तुला त्या क्षणाचा आनंद घ्यावासा नाही वाटला का? काय तर म्हणे आई काही बोलली नाही का? .... अगं ती बोलली असती तरी मलाच बोलली असती बेडरूम मध्ये येउन तुला नसती ना बोलली .  सब मजा किरकिरा कर देती हो. लर्न  टू एन्जोय द मोमेंट , तुझ्या जागी मी असतो ना तर मस्त चहा ची मज्जा घेतली असती गप्पा मारत आणि नंतर नवऱ्याला चार पाच पाप्प्या दिल्या असत्या आणि म्हणाले असते जा बच्चा आज का दिन तुम्हारा है जी भर के कॉम्पुटर पे गेम्स खेलले, हम कुछ नाही कहेंगे और किसीको केहने भी नाही देंगे  ... हा हा हा हा हा ........"  तिने उठून त्याला एक फटका दिला आणि दोघे पोटधरून हसत होते.

         तिला हि त्याचा मुद्दा पटला दोघे मस्त चहा घेत बसले होते गप्पा मारत  तर तो तिला सांगू लागला सकाळी घडलेला किस्सा , " अगं काय  झाला मी walk  ला जायला निघालो तर बाबा बाहेर हाल मध्ये झोपलेले दिसले मी समजलो दोघांचा काय  तरी  बिनसलंय मी त्यांना म्हणालो चला प्रभात फेरी करून येऊ. मग त्यांनी मला सांगितला आई चिडली आहे त्यांच्यावर आणि काल खूप बडबड करत होती म्हणून ते बाहेर TV  बघत बसले आणि तिकडेच झोपले. त्यांना म्हणालो बस इतकंच ना, एक काम करा मस्त गरम गरम बटाटे वडे घ्या एकदम फक्कड चहा बनवा आणि आई कडे घेऊन जा, आणि आईने कोणता तोंडातून शब्द काढायच्या आधी तुम्हीच खूप भावनिक होऊन माझ्या लहानपणच्या गोष्टींचा विषय सुरु करा, मग बघा ह्या पेक्षा चांगली सकाळ तर तुमची होऊच शकणार नाही.

        तिने चेहऱ्यावर खोटा राग आणून त्यला परत एक फटका देऊन म्हणाली ,"   अच्छा.... मिस्टर चान्स पे डान्स .. आणि तू त्यांना म्हणाला थोडा चहा जास्तच टाका माझ्या सौंना पण इम्प्रेस करतो मी थोडासा. "  हे ऐकून तो  मुद्दाम खूप जोरात आणि क्रूरपणे(अगदी क्रूर सिंघ  सारखा ) हसून  म्हणाला ," नादान बच्ची इम्प्रेस तो हम तुम्हे सालो पेहले कर चुके है.... अबब तो हम तुम्हे बस बेवकूफ बना राहे है ..."  ती पण चिडून त्याला चांगलीच चेतावणी देऊन गेली , " आज दिवसभरात कॉम्पुटर unlock तर करून दाखव तू ."

Wednesday, April 27, 2016

       तो आणि ती भाग २
       त्याने तिला विचारला ,"ओये पोरे येतेस का पिक्चर ला ... batman ओरिजिनल वर्जन  लागलाय." तिने जरा तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, "कंटाळा आलाय मला तेच तेच सुपरहिरो पिक्चर बघून दुसरा आहे का कोणता" त्यावर  एकदम हेरोगिरी स्टायल  मध्ये डोळा मारून म्हणाला चल इम्रान हाश्मी का मूवी  देखते है आज हि रिलीस हुई है सनी लेओने के साथ है. ती परत वैतागून म्हणाली बास इतकंच ऐकायचं बाकी होतं.
        तो हसला आणि म्हणाला बघ मी तुला आता प्रामाणिकपणे सगळे पिक्चर चे पर्याय दिले असते तर तू प्रत्येकाला काही न काही कारण काढून नाही म्हंटली असतीस आणि शेवटी दोन तास असेच घालवून म्हणाली असतीस आता खूप उशीर झाला रे जाऊदे आपण कुठे तरी फिरूनच येऊ आणि कुठे फिरायला जायचा ह्यावरून एक तास चर्चा शेवटी घरीच आपण असा चर्चेत वेळ घालवून उरलेला दिवस काढला असता आणि तू रात्री परत माझा डोकं खाणार कि कुठे नेत नाहीस त्या पेक्षा पटकन अवर आणि चाल जाऊयात कोणता हि असेल तो  पिक्चर बघू .... आणि त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढून विचारला ,"का कहती हो मेरी जान " ती पण मस्त गोड हसली आणि म्हणाली ठीक आहे चल.
      तो बाहेर गेला टीव्हि चा रिमोट हातात घेऊन बसणार तेवढ्यात काहीतरी आठव्ल्यासारखा झाला म्हणून पळत आत गेला आणि तिला म्हणाला, " आता कृपया करून मी काय  घालू जिन्स का ड्रेस का साडी आणि कोणती घालू ह्याला इस्त्री नाही तो धुतला नाही हा काल घातला होता तो पर्व घातला होता असा करून ४  ५ ड्रेस निवडून माझ्यापुढे Fashion Show नको करूस, त्या कपाटातल्या ढिगार्यातून जे हाती लागेल ते घाल, मला तू आवडतेस कशीही आणि जेवढे कपडे कपाटात आहेत ते सगळे माझ्याच आवडीनुसार घेतेस तू त्यामुळे १० मिनिटात अवर आणि चल. " त्याची हि पर्तीक्रिया बघून ती जाम हसली पोट धरून आणि ५ मिनिटांनी आवरून येउन त्याच्याकडे बघून म्हणाली , " मी तर मस्तच दिसतीये तू म्हण्तल्या प्रमाणे पण तू का असा बॊर दिसतोयस चांगला शर्ट नाहीये का तुझ्याकडे , जा पहिले आणि थोडा आवर केस पण विंचेर.  त्याने दोन मीन नझर रोखून तिच्याकडे पहिला चिडल्यासारखा "लूक " दिला तिच्या गळ्याभोवती हात टाकून जवळ ओढून म्हणाला एका गयबानीला गयबानाच शोभून दिसतो समजला ना."   
 तो आणि ती भाग 1

आज तिला कामावरून यायला खूप उशीर झाला होता. तो लौकर येउन Laptop वर काहीतरी करत बसला होता. तिने घरात पाऊल टाकला नाही की सासूबाई म्हणाल्या, "अगं.... कित्ती उशीर .... माझं बाळ दिवसभर काम करून थकून भागून आलंय, केवढं सुकून गेलंय माझं चिमणं. ती ऐकत होती गालातल्या  गालात हसत ही होती आणी आपला आवरत ही होती. तिकडे सासुबायींच  चालू होता, " आमच्या काळी नवरा घरात यायच्या आधी स्वयपाक तयार असे ...... आम्हाला कुठे बाई  इतका सुख तुमच्या सारखा...... अगं बाई आधी गरम गरम चहा टाक आणी पहिल्या माझ्या बाळाला काहीतरी खायला दे...... " हे रोज चं पुराण एकीकडे चालू होतं.

     ती हळूच त्याच्या मागून गेली आणी त्याच्या कानात पुटपुटली ," काय  रे बाळ  ..... झाला का तुझा facebooking ... आणि बाळाच्या आईला वाटत  बाळ काम करतय ..... " असा म्हणत ती मिश्किल पाने हसत स्वयपाक खोलीत निघून गेली.   तो पण तिच्या मागे स्वयपाक खोलीत गेला आणि विचारू लागला का ग  झाल का product release  , by the way तुला सकाळी सांगायचं राहून गेल , तू आज लैच मादक दिसत होतीस." ती गालातल्या गालात हसली आणि त्याला ढकलून म्हणाली , "चल हो बाजूला " आणि तो जोर जोरात हसू लागला.... बाहेरून सासुबींनी विचारलं का हसताय माझं बाळ, इकडून हा जोरात ओरडला आग मी खूप घाण पदलो ना तर हिच्या नाकातले केस जळले. त्या हि मनमुराद हसल्या आणि त्या विषयावर नवीन अध्याय सांगू लागल्या .. म्हणून तर मी तिला म्हणते रोज दोन्ही वेळेला कसं ताझं बनवत जा कोशिंबीर, आमटी, तूप लाऊन चपात्या .... पचन चांगला झाला कि असा त्रास होत नाही .....हे सगळं दोघे स्वयपाक खोलीत ऐकत होते आणि फिदी फिदी हसत होते .. तो भाजी चिरता चिरता आईचा आवाज काढून तिला म्हणाला आजकाल चे नवरे बाईकांना जरा त्रास पडू देत नाही, तरी बरं आजकाल बाईकांना आमच्या एवढं काम नसतं. ती पण जोर जोरात हसत होती आणि त्याला म्हणाली जहापणा तुस्सी great हो आणि त्याच्या हातात एक कागद ठेऊन म्हणाली तोफू कुबूल करो .... त्याने कागद पहिला  आणि खूप खुश झाला त्याच्या डोळे पाणावले होते त्याने तिला  मिठीत घेऊन म्हंटल बस कर पगली रुला देगी क्या आणि दोघे मनापासून हसले.

त्याने बाहेर जाऊन खूप आनंदाने आई बाबांना सांगितला , "आई बाबा तिचा निकाल आलाय तिन MBA  चं पहिला सत्र distinction मध्ये पास केलंय, मी पेढे आणतो. " बाबा एकदम खुश होऊन म्हणाले वा बेटा आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा, घर नौकरी सांभाळून तू शिक्षण हि घेतेस , अशीच पुढे शिकत राहा आम्ही कायम तुझ्या पाठीशी राहू.  सासूबाई नी थोडा विचार करून आपला विचार मांडला बाई तू शिक्षिकेची नौकरी का नाही करत तुला भरपूर वेळ भेटेल दोन वेळ चा स्वयपाक करायला आणि सगळं घरकाम करायला. त्यावर बाबा म्हंटले की काय   करणार अग तुझं बाळ बारावीत असतांना हिला म्हंटला मला engineer होयचं मग आता हिच्या उत्तर पत्रिकेतून कॉपी केल्याशिवाय का तुझं बाळ engineering पास होणार होता? म्हणून ती पण engineer झाली .. आणि सगळे जोरजोरात हसू लागले. आईंचा हिरमुसलेला चेहरा बघून दोघांनी आईला मिठी मारली तेवढ्यात तिकडून बाबा पेढे घेऊन आले.


........ tbc