तो आणि ती भाग ३
आज शनिवार उशिरा उठायचा दिवस, पण रोज सकाळी लौकर उठायची सवय असल्यामुळे झोप काही लागत नव्हती, तरी कसा तरी ताणून ती ८.३० ला शेवटी बेड मधून बाहेर पडली इकडे तिकडे नझर टाकली तो काही दिसत नव्हता पण एकंदरीत खोलीतला अस्ताव्यस्त पसारा पाहून ती समजून गेली ह्याला अचानक पोटावरच्या थराचा साक्षात्कार झालाय आणि जोश मध्ये येउन प्रभात फेरी मारायला गेलाय. पसारा म्हणजे वर्षभर कुजत पडलेले स्पोर्ट शुझ बाहेर काढायला आजूबाजूचे बाकीचे बुटाचे खोके कपाटाबाहेर अस्ताव्यस्त पडले होते. ती फ्रेश होऊन चहा बनवायला स्वयपाक खोलीत जायला निघाली समोरून तो हातात ट्रे मध्ये चहा आणि काहीतरी खायला घेऊन येतांना दिसला, तिला वाटला ती अजून झोपेतच आहे ती परत आत जाऊन तोंड धुण आली.
ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत बसली होती आणि काहीतरी बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात तो म्हणाला , " गरम गरम चहा आणि बटाटा वडा ... इंजोय्य्य बेबी ..." त्यावर ती चेहऱ्यावर नेहेमीचा टोमणा भाव आणून म्हणाली , " चक्क तू माझ्यासाठी आयता चहा बनवून खोलीत घेऊन आलास आईने काहीच टोमणा नाही मारला." तो आधी हसला तिचा ऐकून मग प्रेमाने तिच्या जवळ जाऊन अगदी रोमांटीक झाल्यासारखा दाखवून म्हणाला, " आई मध्ये आलीच पाहिजे का ? तुझी नेहेमी इच्छा असते कि मी एकदातरी सकाळी उठल्यावर तुझ्या हातात असा चहा नष्ट द्यावा आज पूर्ण झालीये तर तुला त्या क्षणाचा आनंद घ्यावासा नाही वाटला का? काय तर म्हणे आई काही बोलली नाही का? .... अगं ती बोलली असती तरी मलाच बोलली असती बेडरूम मध्ये येउन तुला नसती ना बोलली . सब मजा किरकिरा कर देती हो. लर्न टू एन्जोय द मोमेंट , तुझ्या जागी मी असतो ना तर मस्त चहा ची मज्जा घेतली असती गप्पा मारत आणि नंतर नवऱ्याला चार पाच पाप्प्या दिल्या असत्या आणि म्हणाले असते जा बच्चा आज का दिन तुम्हारा है जी भर के कॉम्पुटर पे गेम्स खेलले, हम कुछ नाही कहेंगे और किसीको केहने भी नाही देंगे ... हा हा हा हा हा ........" तिने उठून त्याला एक फटका दिला आणि दोघे पोटधरून हसत होते.
तिला हि त्याचा मुद्दा पटला दोघे मस्त चहा घेत बसले होते गप्पा मारत तर तो तिला सांगू लागला सकाळी घडलेला किस्सा , " अगं काय झाला मी walk ला जायला निघालो तर बाबा बाहेर हाल मध्ये झोपलेले दिसले मी समजलो दोघांचा काय तरी बिनसलंय मी त्यांना म्हणालो चला प्रभात फेरी करून येऊ. मग त्यांनी मला सांगितला आई चिडली आहे त्यांच्यावर आणि काल खूप बडबड करत होती म्हणून ते बाहेर TV बघत बसले आणि तिकडेच झोपले. त्यांना म्हणालो बस इतकंच ना, एक काम करा मस्त गरम गरम बटाटे वडे घ्या एकदम फक्कड चहा बनवा आणि आई कडे घेऊन जा, आणि आईने कोणता तोंडातून शब्द काढायच्या आधी तुम्हीच खूप भावनिक होऊन माझ्या लहानपणच्या गोष्टींचा विषय सुरु करा, मग बघा ह्या पेक्षा चांगली सकाळ तर तुमची होऊच शकणार नाही.
तिने चेहऱ्यावर खोटा राग आणून त्यला परत एक फटका देऊन म्हणाली ," अच्छा.... मिस्टर चान्स पे डान्स .. आणि तू त्यांना म्हणाला थोडा चहा जास्तच टाका माझ्या सौंना पण इम्प्रेस करतो मी थोडासा. " हे ऐकून तो मुद्दाम खूप जोरात आणि क्रूरपणे(अगदी क्रूर सिंघ सारखा ) हसून म्हणाला ," नादान बच्ची इम्प्रेस तो हम तुम्हे सालो पेहले कर चुके है.... अबब तो हम तुम्हे बस बेवकूफ बना राहे है ..." ती पण चिडून त्याला चांगलीच चेतावणी देऊन गेली , " आज दिवसभरात कॉम्पुटर unlock तर करून दाखव तू ."

No comments:
Post a Comment