Wednesday, April 27, 2016

 तो आणि ती भाग 1

आज तिला कामावरून यायला खूप उशीर झाला होता. तो लौकर येउन Laptop वर काहीतरी करत बसला होता. तिने घरात पाऊल टाकला नाही की सासूबाई म्हणाल्या, "अगं.... कित्ती उशीर .... माझं बाळ दिवसभर काम करून थकून भागून आलंय, केवढं सुकून गेलंय माझं चिमणं. ती ऐकत होती गालातल्या  गालात हसत ही होती आणी आपला आवरत ही होती. तिकडे सासुबायींच  चालू होता, " आमच्या काळी नवरा घरात यायच्या आधी स्वयपाक तयार असे ...... आम्हाला कुठे बाई  इतका सुख तुमच्या सारखा...... अगं बाई आधी गरम गरम चहा टाक आणी पहिल्या माझ्या बाळाला काहीतरी खायला दे...... " हे रोज चं पुराण एकीकडे चालू होतं.

     ती हळूच त्याच्या मागून गेली आणी त्याच्या कानात पुटपुटली ," काय  रे बाळ  ..... झाला का तुझा facebooking ... आणि बाळाच्या आईला वाटत  बाळ काम करतय ..... " असा म्हणत ती मिश्किल पाने हसत स्वयपाक खोलीत निघून गेली.   तो पण तिच्या मागे स्वयपाक खोलीत गेला आणि विचारू लागला का ग  झाल का product release  , by the way तुला सकाळी सांगायचं राहून गेल , तू आज लैच मादक दिसत होतीस." ती गालातल्या गालात हसली आणि त्याला ढकलून म्हणाली , "चल हो बाजूला " आणि तो जोर जोरात हसू लागला.... बाहेरून सासुबींनी विचारलं का हसताय माझं बाळ, इकडून हा जोरात ओरडला आग मी खूप घाण पदलो ना तर हिच्या नाकातले केस जळले. त्या हि मनमुराद हसल्या आणि त्या विषयावर नवीन अध्याय सांगू लागल्या .. म्हणून तर मी तिला म्हणते रोज दोन्ही वेळेला कसं ताझं बनवत जा कोशिंबीर, आमटी, तूप लाऊन चपात्या .... पचन चांगला झाला कि असा त्रास होत नाही .....हे सगळं दोघे स्वयपाक खोलीत ऐकत होते आणि फिदी फिदी हसत होते .. तो भाजी चिरता चिरता आईचा आवाज काढून तिला म्हणाला आजकाल चे नवरे बाईकांना जरा त्रास पडू देत नाही, तरी बरं आजकाल बाईकांना आमच्या एवढं काम नसतं. ती पण जोर जोरात हसत होती आणि त्याला म्हणाली जहापणा तुस्सी great हो आणि त्याच्या हातात एक कागद ठेऊन म्हणाली तोफू कुबूल करो .... त्याने कागद पहिला  आणि खूप खुश झाला त्याच्या डोळे पाणावले होते त्याने तिला  मिठीत घेऊन म्हंटल बस कर पगली रुला देगी क्या आणि दोघे मनापासून हसले.

त्याने बाहेर जाऊन खूप आनंदाने आई बाबांना सांगितला , "आई बाबा तिचा निकाल आलाय तिन MBA  चं पहिला सत्र distinction मध्ये पास केलंय, मी पेढे आणतो. " बाबा एकदम खुश होऊन म्हणाले वा बेटा आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा, घर नौकरी सांभाळून तू शिक्षण हि घेतेस , अशीच पुढे शिकत राहा आम्ही कायम तुझ्या पाठीशी राहू.  सासूबाई नी थोडा विचार करून आपला विचार मांडला बाई तू शिक्षिकेची नौकरी का नाही करत तुला भरपूर वेळ भेटेल दोन वेळ चा स्वयपाक करायला आणि सगळं घरकाम करायला. त्यावर बाबा म्हंटले की काय   करणार अग तुझं बाळ बारावीत असतांना हिला म्हंटला मला engineer होयचं मग आता हिच्या उत्तर पत्रिकेतून कॉपी केल्याशिवाय का तुझं बाळ engineering पास होणार होता? म्हणून ती पण engineer झाली .. आणि सगळे जोरजोरात हसू लागले. आईंचा हिरमुसलेला चेहरा बघून दोघांनी आईला मिठी मारली तेवढ्यात तिकडून बाबा पेढे घेऊन आले.


........ tbc

No comments:

Post a Comment